आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातची सभा आटोपून राहुल गांधी पुन्हा औरंगाबादेत:आज शहरातच करणार मुक्काम, उद्या होणार 'भारत जोडो' यात्रेत सहभागी

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काॅंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची आज (21 नोव्हेंबरला) गुजरातेतील सुरत, राजकोटमध्ये सभा झाली. तेथील दौरा आटोपून ते आज सायंकाळी​ ​विमानाने​ ​औरंगाबादेत आगमन झाले. ते आज औरंगाबादेतच मुक्काम करतील.

राहुल गांधी आज औरंगाबादेत आल्यानंतर विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी काॅंग्रेसचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मुकूंदवाडी भागातही राहुल गांधींच्या आगमनानंतर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.

शहरातील एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये राहुल गांधी आज मुक्कामी आहेत. राहुल गांधींच ताफा मुकुंदवाडी बस स्टॉप जवळून वेगाने निघून गेला. अनेक कार्यकर्त्यांना राहुल गांधी आल्याचे समजलेही नाही पण राहुल गांधींनी फक्त त्यांच्या गाडीतूनच जाताना हात दाखवल्यानंतर नंतर कार्यकर्त्यांना ते आल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आज औरंगाबादहून सूरतला रवाना झाले होते. त्यानंतर त्यांनी सूरत आणि राजकोट येथे आपली सभा घेतली. त्यानंतर ते पुन्हा संध्याकाळी औरंगाबादला रवाना झाले. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील उपस्थित होता.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण काळे शहर अध्यक्ष युसुफ शेख प्रवक्ते पवन डोंगरे अनिस पटेल कैसर बाबा गौरव जैस्वाल यांची रामा हॉटेलच्या वेळी उपस्थिती होती.तर मुकुंद वाडी बस स्टॉप जवळ स्वागतासाठी गटनेते तथा नगरसेवक भाऊसाहेब पा जगताप, अशोक डोळस, मोतीलाल जगताप बाबुलाल गुजर्र, प्रकाश सानप, पप्पू ठुबे,बबन जगताप, अनिल जगताप,राजु मगरे, सुभाष पाटील, संदीप मनोहर, कांता रनभरे,शुभम साळवे, सतिश जगताप,राजु फलके, चंद्रमुनी काळे, मनोज मगरे,सुरेखा पानखडे,सरोज मसलगे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...