आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजलगाव:गॅस टाकीच्या स्फोटानंतर तीन घराला आग; नगदी रोकड आणि दागिन्यांसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक

माजलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या घटनेमुळे पवार कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे

माजलगाव तालुक्यातील मोगरा अंतर्गत असलेल्या शिवाजीनगर तांडा येथील घरात गुरुवारी दुपारी गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन तीन घराला आग लागली. या आगीत नगदी रोकड सह अन्नधान्य संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून माजलगाव येथील अग्निशामक दलाने तात्काळ मोक्यावर पोहचून ही आग आटोक्यात आणली.

मोगरा अंतर्गत असलेल्या शिवाजीनगर तांडा तेथील अशोक रामा पवार यांच्या घरी 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 च्या दरम्यान गॅस टाकीचा स्फोट झाला. घरी कोणीही नसल्यामुळे या आगीत जीवीतहानी झाली नाही. मात्र, अशोक पवार यांच्या घरातील कपाटातील नगदी 3 लाख 98 हजार रुपये, चार तोळे सोने, फ्रिज, लोखंडी कपाट, ज्वारी-बाजरीचे 20 पोते आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. त्याचबरोबर त्यांच्या बाजुचे भाऊ प्रकाश रामा पवार व विकास रामा पवार यांच्या घरालाही आगीने वे-ढा घातला होता. यात प्रकाश रामा पवार यांच्या घरातील कपाटातील दिड लाख रुपयांची रोकड दोन-तीन तोळे सोने व संसारोपयोगी साहित्य आणि धान्य जळून खाक झाले. तर, विकास पवार यांच्या घरातील एक लाख रुपये नगदी रोकड आणि संसार उपयोगी साहित्य व धान्याची पोती खाक झाली.

अशोक पवार यांच्या घराच्या समोरील शेडमध्ये गाय बांधलेली होती. आगीमध्ये ही गायदेखील गंभीर भाजली आहे. आग लागल्यामुळे गावातल्या सर्व मंडळीने धावपळ करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच माजलगाव येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. ही आग आटोक्यात आणण्यास अग्नीशामक दलाचे अनिल भिसे,कृष्णा रांजवन,सतिश क्षिरसागर,अनिल खंडागळे यांनी मोलाचे प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...