आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कंटेनर, कार, स्काॅर्पिओच्या अपघातात तीन जण जखमी ; धुळे-सोलापूर मार्गावरील घटना

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - सोलापूर महामार्गावरील जामखेड फाट्याजवळ एका कंटेनरने कार व स्कॉर्पिओला धडक दिली. यात कंटेनरच्या चालकासह तीन जण जखमी झाले. मंगळवारी (६ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाच वाजता हा अपघात झाला. एक कार पाचोडकडून जामखेडकडे जात होती. बीडकडे जात असलेल्या भरधाव कंटेनरने कारला वाचवण्याच्या प्रयत्नात जामखेड फाटा येथे हॉटेलवर थांबलेल्या स्कॉर्पिओला धडक दिली. त्यात स्कॉर्पिओमधील राणी सागर भिसे (२०) या किरकोळ जखमी झाल्या, तर कारमधील पाचोड येथील डॉ. संभाजी भोजने हेदेखील किरकोळ जखमी झाले. या दोन्ही वाहनांना धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटल्याने कंटेनर काही अंतरावर जाऊन उलटला. त्यामुळे कंटेनरचा चालकही किरकोळ जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच माळेवाडी, भोकरवाडी टोलनाका येथील कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. आता तिन्ही जखमींची प्रकृती स्थिर आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात भीषण झाला असता तर सात ते आठ जणांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता.

बातम्या आणखी आहेत...