आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संताप जनक:जनावरे चोरीच्या कारणावरून तिघांना रात्रभर बेदम मारहाण; मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

नांदेड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनावरे चोरीच्या कारणावरून तिघा जणांना रात्रभर मारहाण केल्याची घटना 27 जानेवारी रोजी रात्री घडली होती. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनामधून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी 31 जानेवारी रोजी सात जणांविरुद्ध इतवारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देगलूर नाका परिसरातील मोहम्मद वाजिद कुरेशी मोहम्मद बाबू कुरेशी हा मजूर 27 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजता अजिमोद्दीन डिलक्स फंक्शन हॉलसमोर थांबला होता. यावेळी दुचाकीवर आलेल्या मो.आयुब मो.जान व अब्दुल जब्बार अब्दुल एकबाल यांनी तुला बोलायचे आहे, असे म्हणून दुचाकीवर इदगाह कमानीच्या पुढे नदीकाठी घेवून गेले. यावेळी तेथे मोहम्मद आमेर, इग्राण मन्नान, आयुबचा भाचा, नोकर व इतर त्या ठिकाणी हजर होते. यावेळी आरोपींनी संगनमत करुन तु आमची जनावरे चोरी करतो असे आरोप लावून मोहम्मद वाजिद यास लाकडाने शरीरावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. मारहाणीचा हा प्रकार दुसऱ्या दिवशी (28 जानेवारी) पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू होता. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.