आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कूल सील:नोंदणीकृत पत्त्यावर नसलेले तीन मोटार ड्रायव्हिंग स्कूल सील

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोंदणीकृत पत्त्यावर नसलेले तीन माेटार ड्रायव्हिंग स्कूल आरटीओने गुरुवारी सील केले. अारटीअाेच्या अधिकाऱ्यांनी कुबेर मोटार ड्रायव्हिंग स्कूल, आदर्श मोटार ड्रायव्हिंग स्कूल आणि न्यू मॉडर्न मोटार ड्रायव्हिंग स्कूलची पाहणी केली.

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ प्रमाणे चालक प्रशिक्षण संस्था (मोटार ड्रायव्हिंग स्कूल) आरटीओने ज्या पत्त्यावर परवानगी दिली आहे त्याच पत्त्यावर कार्यरत असणे बंधनकारक आहे. असे असतानाही तिन्ही मोटार ड्रायव्हिंग स्कूल नोंदणीकृत पत्त्याऐवजी अधिकृतरीत्या इतरत्र सुरू हाेते. प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांच्या पथकाने हे तिन्ही स्कूल सील केले.

बातम्या आणखी आहेत...