आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास:शहरात तिघांचीगळफास घेऊन आत्महत्या ; ​​​​​​​टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या चालकाचा समावेश

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या २४ तासांत तिघांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. यात तीन तरुण, तर एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या चालकाचाही समावेश आहे. पहिल्या घटनेत हर्सूल येथील चेतनानगरातील रहिवासी अविनाश मोहन सपकाळ (३२) यांनी राहत्या घरी गळफास घेतला. स्वत:ची दोन वाहने असलेले अविनाश टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीत व्यवसाय करत होते. त्यांची पत्नी, दोन मुले दिवाळीनिमित्त माहेरी गेली होती, तर आई-वडील शेतात सोयाबीनचे पीक काढण्यासाठी गेले होते. यादरम्यान अविनाश यांनी टोकाचे पाऊल उचलले. दुसरी घटना हर्सूल परिसरातच घडली. विशाल नवनाथ गुंजाळ (२०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कबीर मठ परिसरातील एका झाडाला त्याने दुपारी गळफास घेतला. हा प्रकार ४ वाजता समोर आला. विश्रांतीनगरातील ४१ वर्षीय दत्ता जगन्नाथ वाकळे यांनी गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...