आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागा राखीव:पॉलिटेक्निकसाठी यंदा तीन फेऱ्या ; कोरोनामध्ये पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन जागा राखीव

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा दोनऐवजी तीन फेऱ्या होणार आहेत. कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी पीएम केअर अंतर्गत दोन जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीची प्रक्रिया सुरू झालीआहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे तीन ऐवजी दोनच प्रवेश फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. यंदा तीन फेऱ्या राबवण्यात येतील. तसेच मराठी माध्यम निवडण्याची संधी देखील उपलब्ध असणार आहे. आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो. आजवर त्यांना मर्यादित शाखेत प्रवेश मिळत होता.आता कोणत्याही शाखेत प्रवेश घेता येईल. ६० टक्के विद्यार्थ्यांकडूनआयटीला पसंती : दहावीच्या निकालानंतर महाविद्यालयांमध्ये येणारे पालक, विद्यार्थी करिअरच्या संधी पाहूनच अभ्यासक्रमांची विचारणा, निवड करत आहेत. आता आयटी, कॉम्प्युटर सायन्स या विषयांना ६० टक्के विद्यार्थी पसंती दर्शवत आहेत.

बातम्या आणखी आहेत...