आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 लाखांचे नुकसान:आझाद चाैकात तीन दुकाने जाळली;सीसीटीव्हीत कैद झालेल्या दुचाकीस्वाराचा शाेध सुरू

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका अज्ञाताने तीन दुकानांवर ज्वलनशील पदार्थ टाकून ते पेटवून दिले. यात तिन्ही दुकाने जळून ४ लाख रुपयांचे नुकसान झाले. हा प्रकार रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आझाद चौकातील कुलस्वामिनी मंगल कार्यालयाजवळील बाजारपेठेत घडला. एका सीसीटीव्हीत हा दुचाकीस्वार कैद झाला असून सिडकाे पाेलिस त्याचा शाेध घेत आहेत.

रहेमानिया कॉलनीतील सय्यद इब्राहिम सय्यद मुस्तफा यांचे कुलस्वामिनी मंगल कार्यालयाच्या बाजूला गोल्डन एलईडी इलेक्ट्रिकल नावाचे दुकान आहे. त्यांच्या बाजूला जटवाडा परिसरातील सरफराज खान इस्माईल खान यांचे बाॅडी फिटर नावाचे गॅरेज आहे, तर सय्यद एजाज मुस्तफा यांचे सलीम मोटार गॅरेज आहे. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास तिघेही दुकान बंद करून घरी गेले. पहाटे ही दुकाने चहुबाजूने पेटलेली हाेती. तिघांचे मिळून चार लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पहाटे सय्यद यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सिडको पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

अज्ञातावर गुन्हा दाखल पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान दुकानासमोरून एक दुचाकीचालक जाताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यानेच दुकानांवर ज्वलनशील पदार्थ टाकून हा प्रकार केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. अंमलदार भारती गायकवाड तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...