आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:रेल्वे परीक्षार्थींसाठी तीन विशेष गाड्यांची सोय

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे बोर्डातर्फे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीत (एनटीपीसी) भरतीसाठी देशातील वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला जाणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्रातून औरंगाबादसह चार ठिकाणाहून विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. या रेल्वे शनिवारी सुटतील आणि रविवारी परीक्षेच्या ठिकाणी पोहोचतील. परतीच्या प्रवासातही रविवारी परीक्षा संपल्यानंतर काही तासांनी संबंधित स्थानकाहून रेल्वे निघेल.

- जबलपूर - नांदेड - जबलपूर : (०२१९०/०२१८९) ही गाडी मुरवारा, दमोह, सौगोर, बिना, गंज बगोदा, विदिशा, भोपाळ, नर्मदापुरम, इटारसी, हरदा, खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी आणि पूर्णा स्थानकांवर थांबेल. - नगरसोल- औरंगाबाद - गुंटूर (०७६७७) : विजयवाडा, कोंडापल्ली, खम्मम, वारंगल, काझीपेठ, सिकंदराबाद, कामारेड्डी, निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, जालना आणि औरंगाबाद. - औरंगाबाद - गुंटूर (००७६७८) : जालना, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, निजामाबाद, कामारेड्डी, सिकंदराबाद, काझीपेठ, वारंगल, खम्मम, कोंडापल्ली, विजयवाडा. - हुबळी-औरंगाबाद-हुबळी (०७३८५ / ०७३८६) : धारवाड, लोंढा, बेळगाव, घटप्रभा, मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, लातूर, लातूर रोड, परळी, परभणी, जालना, औरंगाबाद. - आदिलाबाद-चेन्नई- आदिलाबाद (०७६८१ /०७६८२) : किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, धर्माबाद, बासर, निझामाबाद, अर्मुर, कोराटला, करीमनगर, पेद्द्पल्ली, वरंगल, खम्मम, विजयवाडा, कृष्णा केनल, न्यू गुंटूर, तेनाली, चिराला, ओंगोल, नेल्लोर, गुडूर स्थानकांवर थांबेल.

बातम्या आणखी आहेत...