आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:नागापूरमध्ये एकाच रात्री तीन ठिकाणी झाली चोरी

नागापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड तालुक्यातील नागापूर येथे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीची घटना घडली. चाेरट्यांनी येथील भीमराव सोनवणे यांच्या घराचा कडी कोयंडा ताेडून आत प्रवेश केला. घरातील १२ हजार रुपये रोख व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण ६५ हजार रुपयांचे एेवज चाेरला, तर जहूरखान जफरखान यांच्या घरातील कपाटाचे लॉकर तोडून दोन हजार रुपयांची चोरी झाले. तसेच पूर्णेश्वर महादेव मंदिराची दानपेटी फोडून त्यातील रक्कम चाेरून नेली. या चाेरीच्या घटना शनिवारी (१७ डिसेंबर) पहाटे उघडकीस आल्या. याप्रकरणी पिशोर पोलिसांनी श्वान पथक व ठसेतज्ज्ञ पथकाला पाचारण केले होते.

बातम्या आणखी आहेत...