आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात सोमवारी बारा तासांत विविध भागात तीन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात एकाने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून इतर दोघांची कारणे मात्र अस्पष्ट आहेत. नारेगावातील दीपक ज्ञानेश्वर बेलकर (२१) एका खासगी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करत होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्याला फीटचा आजार जडला होता. दोन दिवसांपूर्वीच उपचार घेऊन तो घरी परतला होता. सोमवारी सायंकाळी ६:३० वाजता कुटुंबाला तो लटकलेल्या अवस्थेतच दिसला. याप्रकरणी हवालदार साहेब खान पठाण तपास करीत आहेत. आजारामुळेच त्याने गळफास घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. दुसऱ्या घटनेत रांजणगावमधील कृष्णानगरातील दिलीप उत्तम राठोड (२६) यानेदेखील सोमवारी सायंकाळी गळफास घेतला.
व्हॉट्सअॅप स्टेटसला गाणे लावून आत्महत्या : तिसऱ्या घटनेत कांचनवाडीतील काश्मीरनगरातील विष्णू बामणे (२८) या तरुणाने कांचनवाडीतील भूमी बंधाऱ्याजवळील एका जांभळीच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. विष्णूचा दूध विक्रीचा व्यवसाय होता. त्याने आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअॅप स्टेटसला एक गाणे अपलोड करून नंतर गळफास घेतला. कुटुंबाच्या चौकशीत मात्र कारण अस्पष्ट आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.