आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगरातील एपीआय कॉर्नर परिसरात शुक्रवारी रात्री ८.४५ वाजता तिघांच्या टोळीने गोळीबार करून लूटमार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. फायनान्स व मल्टिसर्व्हिसेसच्या कार्यालयात हा प्रकार घडला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
मूळ हिंगोलीचे शुभम आणि विलास राठोड (रा. महालक्ष्मी चौक) या भावांचे एपीआय कॉर्नर पेट्रोल पंपामागे शटरमध्ये शुभम फायनान्स व मल्टिसर्व्हिसेस नावाने कार्यालय आहे. विलास रात्री कार्यालयात असताना ८:४८ वाजता तोंडाला मास्क लावलेला एक तरुण आत आला व शिवीगाळ करून ‘चल, सब पैसे निकाल’ अशी धमकी दिली. त्याने अचानक कमरेला लावलेले पिस्तूल काढून टेबलवर गोळीबार केला. यानंतर विलास यांनी खिशातील २०० रुपयांची नोट काढून देताच हल्लेखोराला राग आला. त्याने ती नोट त्यांच्या तोंडावर फेकत शिव्या देत बाहेर येऊन एक कार थांबवून काचेवर पिस्तूल मारून ‘चल, पैसे निकाल’ असे धमकावले. यात पिस्तुलाची स्प्रिंग तुटून स्प्रिंगसह गोळ्या खाली पडल्या. त्यामुळे त्याला पुन्हा गोळीबार करता आला नाही.
एका हल्लेखोराचा पायी, तर इतर दोघांचा कारमधून पोबारा
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांपैकी दोघे कारमध्येच बसले हाेते, तर एकाने बाहेर येत हल्ला केला. जाताना एकाने पायी ठाकरेनगरकडे, तर दोघांनी पांढऱ्या स्विफ्ट डिझायरमधून एपीआय उड्डाणपुलाकडे पळ काढला. रात्री उशिरापर्यंत आराेपींचा शाेध सुरू हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.