आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी, तसेच कुशल कामगार तयार करण्यासाठी मसिआ संघटनेच्या नियमित पाठपुराव्यामुळे अखेर भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाकडून राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजनेंतर्गत ‘मसिआ स्ट्राइव्ह’ प्रकल्पाला मान्यता मिळाली असून मसिआ, जीआयझेड आणि डीईव्हीटी यांच्या सहकार्याने, जागतिक बँकेच्या आर्थिक मदतीने प्रकल्प पूर्णत्वास येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पात युवक-युवती, बेरोजगारांना कारखान्यांत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
वाळूजच्या मसिआ कार्यालयात ९ मार्च रोजी जीआयझेडच्या डॉ. ज्युली रेव्हिएरे, रॉडनी रेव्हिएरे, एस. आर. सूर्यवंशी व मसिआचे अध्यक्ष किरण जगताप आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन समारंभ पार पडला. या उपक्रमांतर्गत आयटीआय, दहावी उत्तर्ण युवक-युवती आणि बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षण देणे, त्यांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन प्रशिक्षित केले जाणार आहे. यामध्ये बेरोजगारांना सीएनसी ऑपरेटर, मशीनिंग टेक्निशियन, वायर हारनेस, असेम्ब्ली ऑपरेटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन आणि फिटर या ट्रेडचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष कंपनीत पाहणी : डॉ. रॉडनी रेव्हिएरे यांनी उद्योजक अर्जुन गायकवाड, राजेश मानधनी आदींसह जिजाई इंडस्ट्री कंपनीत भेट देऊन नवख्या युवक, युवतींना कशा प्रकारे मशीनवर कामाचे प्रशिक्षण दिले जाते, याचा आढावा घेतला. या वेळी मसिआचे सचिव राहुल मोगले, उपाध्यक्ष अनिल पाटील आदी उपस्थित होते.
महिलांशी, उद्योजकांशी साधला संवाद
डॉ. ज्युली रेव्हिएरे यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उद्योगांविषयी, तसेच भविष्यात उद्योग वाढीकरिता काय करता येईल, याबाबत महिला उद्योजकांचे मत जाणून घेतले. या वेळी त्यांनी, भविष्यात ई-व्हेइकल, ग्रीन इकॉनॉमी या क्षेत्रात काम करण्याचे आवाहन केले. त्यासाठी जर्मनी नक्कीच मदतीचा हात पुढे करेल, अशी ग्वाही दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.