आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात 3 दिवस पावसाचे:21 ते 23 ऑक्टोबरदरम्यान राज्यात अनेक जागी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तर महाराष्ट्रातून तीन दिवसांत मान्सून परतणार

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र व चक्रवात स्थितीमुळे राज्यात ३ दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. २-३ दिवसांत उत्तर महाराष्ट्रातून मान्सून परतण्यास अनुकूल स्थिती आहे. दरम्यान, कुलाबा वेधशाळेने संपूर्ण विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला. साधारणपणे उत्तर महाराष्ट्रातून ५ ऑक्टोबरला मान्सून परततो. सध्या तो दक्षिण गुजरात व उत्तर मध्य प्रदेशातच थबकला आहे. आयएमडीच्या मते दक्षिण गुजरात, उत्तर अरबी समुद्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर महाराष्ट्रातून मान्सून परतण्यास दोन ते तीन दिवसांत अनुकूल स्थिती आहे.

यलो अलर्ट :

नाशिक, पुणे, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, कोकण व संपूर्ण विदर्भात या काळात १५.५ ते ६४.४ मिमी पावसाची शक्यता.

ग्रीन अलर्ट :

धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी या जिल्ह्यांत २.५ ते १५.५ मिमी पावसाची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...