आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅडव्हांटेज एक्स्पो:प्लास्टिकवर बंदीपेक्षा पुनर्वापराचे कायदे कडक करा; निर्यातीत संधी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्लास्टिक उद्योगात निर्यातीला मोठी संधी असून २०२५ पर्यंत भारताची प्लास्टिक निर्यात २५ अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे मत प्लास्टिक उद्योगाची शीर्ष संघटना प्लेक्स कौन्सिलचे श्रीकृष्ण आमलेकर यांनी व्यक्त केले. अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३ येथे आयोजित प्लास्टिक उद्योगातील निर्यात व व्यवसायाच्या संधी या परिसंवादात ते बोलत होते. प्लास्टिकवर बंदीपेक्षा पुनर्वापराचे कायदे कडक करून त्यांची कडक अंमलबजावणी करण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आज दिवसभर या प्रदर्शनाला २४,७५० नागरिकांनी भेट दिली.

भारतातील प्लास्टिक निर्मितीचा उद्योग ३६७ दशलक्ष टनांवर पोहचला आहे. यात वार्षिक ८.२ टक्के वाढ होत असून वार्षिक उलाढाल ३ लाख कोटींची आहे. मात्र, निर्यातीतील वाटा अवघा १.१ टक्का असल्याने त्यात मोठी संधी असल्याचे माहिती आमलेकर यांनी दिली. श्रीकृष्ण आमलेकर आणि मृणाली इल्ले यांनी मार्गदर्शन केले. या परिसंवादात श्रीसुंदू मुखर्जी, उद्योजक सुनील रायठठ्ठा, बीपीसीएल, एचपीसीएल, इंडियन ऑइल, गेल आणि माझगाव डॉक्सचे प्रतिनिधी सहभागी झाले. त्यांच्याशी किशोर राठी व मनीष अग्रवाल यांनी संवाद साधला.

एक्स्पोमध्ये आज होणारी व्याख्याने, कार्यक्रम हाॅल क्र. १ : {सकाळी ११ ते ११:२० : “इनोव्हेशन, स्कील डेव्हलपमेेंट’वर जीआयझेडचे रविशंकर कोरगल यांचे व्याख्यान { ११.२० ते १२ दरम्यान “इंजिनिअरिंग व आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन’ याबाबत कामगार व रोजगार विभागाचे समन्वयक डॉ.अनिल जाधव यांचे मार्गदर्शन { १२ ते १ :“आयटीआय व इंजिनिअरिंगमधील आधुनिक अभ्यासक्रम’ या विषयावरील चर्चासत्रात प्रा.सतीश सूर्यवंशी, प्रा.डॉ.उल्हास शिंदे, डॉ.भालचंद्र आणि जयंत यावलकर यांचे मार्गदर्शन { ३ ते ४ : डिफेन्स सेक्टरमधील संधीबाबत शंतनू मिश्रा यांचे व्याख्यान { ४ ते ५ : “ई-वाहनांच्या सुट्या भागांच्या निर्मितीतील संधी’ याबाबत एपीजे अब्दुल कलाम विद्यापीठातील प्रॉडक्ट डेव्हलपमेंट इंजिनिअर शिवमसिंग तोमर यांचे मार्गदर्शन

हॉल क्र.२ { १०:३० ते १०:५० - “बिल्डिंग अॅन्वेल ऑपरेटिंग प्लॅन अँड इम्प्रूव्ह नेट प्राॅफिट’वर मदन बाजपेईंचे मार्गदर्शन {१०:५० ते ११:१० : “स्टार्टअप्स आणि सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी अर्थपुरवठा’ यावर बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापक उमाकांत केसगिरे यांचे व्याख्यान { ११:१० ते ११:३० : “एमएसएमईसाठी सबसिडी’वर सीए अनुज चांडक यांचे मार्गदर्शन { ११:३० ते ११:५० : “उद्योगांसाठी सिडबीच्या योजना’ यावर भगवान चंदनानी यांचे व्याख्यान { ११:५० ते १२:१० :एमएसएमईच्या प्रगतीबाबत एसएमई बिझनेसचे नितीन शर्मा यांचे मार्गदर्शन { १२:१० ते १२:३० : “उद्योगांसाठी म्युच्युअल फंड्स’वर आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचे भावेश शर्मा यांचे व्याख्यान

बातम्या आणखी आहेत...