आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेशाची गती मंदावली:अंडरटेकिंग लिहून घेऊन प्रवेश देण्याची महाविद्यालयालयांवर वेळ;  आयसीएसई-सीबीएसई आणि राज्यमंडळाच्या अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही टीसी नाही

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकरावी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु आहे. दहा दिवस झालेत प्रवेश सुरु होवून परंतु हवा तसा प्रतिसाद प्रवेशासाठी महाविद्यालयांना मिळत नाही. अजूनही संभ्रम कायम आहेत. तर आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाच्या १५ टक्के मुलांना शुल्क न भरल्याने टीसी मिळालेले नाहीत. तर राज्यमंडळाचे ५ टक्के विद्यार्थी असे आहेत ज्यांना टीसी आणि गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. अशा विद्यार्थ्यांकडून आता हमीपत्र लिहून घेवून प्रवेश देण्याची वेळ महाविद्यालयांना आली आहे. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्र मोठया प्रमाणात प्रभावित झाले आहे. परिणामी प्रवेश प्रक्रियेवरही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. १६ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहिर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. परंतु शासनाने अकरावीसाठी सीईटी जाहिर केल्याने प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संभ्रम निर्माण झाले होते.

उच्च न्यायालयाने सीईटी परीक्षा रद्द ठरवल्याने प्रवेश प्रक्रियेचा मार्ग माेकळा झाला आहे. परंतु लांबलेल्या प्रवेश प्रक्रिया आणि संभ्रमावस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांनी दोन वर्ष जाण्याची कटकट नाही. हवं ते करता येत या नावाखाली ग्रामीण भागात प्रवेश घेत आहेत. एवढेच नाही तर शहरात ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला चौकशी केले त्यातील बहुतांश विद्यार्थी प्रवेशासाठी आलेच नाहीत. तर ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यांची मात्र टीसी न मिळणे आणि गुणपत्रिका अद्यापही हातात नसल्याने आयसीएसई, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत असल्याचे महाविद्यालयांनी म्हटले आहे. जिथे नामांकित महाविद्यालांची प्रवेश प्रक्रिया तीन ते चार दिवसात पूर्ण होत होती तिथे आज घडीला प्रवेश प्रक्रिया सुरु होवून दहा दिवस उलटले आहेत. तरी देखील प्रवेश पूर्ण झालेले नाहीत. असेही महाविद्यालयांनी सांगितले.

अंडरटेकींग लिहून घेण्याची वेळ
अजूनही हवा तसा प्रतिसाद प्रवेशांना मिळत नाही. याचे कारण काही विद्यार्थ्यांना अजूनही गुणपत्रिक मिळालेल्या नाहीत. ज्यात पाच ते दहा टक्के राज्यमंडळाचे विद्यार्थी आहेत. तर मोठी अडचण ही सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची होत आहे. त्यांना टीसी न मिळाल्याने शेवटी अंडरटेकींग लिहून घेत तात्पूर्ते प्रवेश दिले जात आहे. त्यांच्याकडून किती वसात टीसी मिळेल याची हमी लिहून घेत प्रवेश दिला जात आहे. - आर.बी. गरुड उपप्राचार्य देवगिरी महाविद्यालय​​​​​​​

प्रतिसादाची गती मंदावलेलीच
अकरावी प्रवेशाची गती ही निकालानंतर वेग धरले असे वाटले होते. याचे कारण आपल्याकडे ऑफलाइन प्रवेश यंदा करण्यात आले. परंतु, अजूनही हवा तसा प्रतिसाद नाही. अनुदानितचे ७० तर विनाअनुदानितचे केवळ ३० टक्केच प्रवेश झाले आहेत. - प्रा. अमोल झाल्टे स.भु.विज्ञान महाविद्यालय

बातम्या आणखी आहेत...