आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताणतणाव:वेळेचे नियोजन, संयमाने वर्तन करा : मधुस्मिता माता

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वेळेचे अचूक नियोजन तुमच्यावरील ताणतणाव कमी करेल. विवेेक आणि संयमाने वागलात तर तुमच्याशी अनेक जण जोडले जातील, यामुळे आयुष्यात सहकार्य वाढेल. त्यागाने तुमची सहनशीलता, संयम वाढेल, असा उपदेश साध्वी मधुस्मिता माता यांनी दिला. पानदरिबा येथील तेरापंथ भवनमध्ये नववर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जालना, बीड, जळगाव येथून २०० भाविक यामध्ये सहभागी झाले होते.

साध्वी मधुस्मिता यांच्यासह साध्वी स्वस्थप्रभा, साध्वी भावयशा, साध्वी सहजयशा, साध्वीश्री मल्लिप्रभा यांचीही उपस्थिती होती. प्रारंभी माताजींनी स्वरचित गीताचे गायन केले. या वेळी सभेचे कौशिक सुराणा उपस्थित होते.

दैनंदिनीचे प्रकाशन खान्देतील जैन श्वेतांबर तेरापंथी सभा तसेच तेरापंथ युवक परिषद जळगावची वार्षिक दैनंदिनीचे प्रकाशनही करण्यात आले. पाचही माताजी बीडचा चातुर्मास संपवून औरंगाबादेत आल्या आहेत. महिनाभर त्यांचे वास्तव्य राहील. अंकुर लुणिया, मंत्री तेरापंथ परिषद

बातम्या आणखी आहेत...