आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत परीक्षा केंद्रांवर गोंधळ:विद्यापीठाने क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी पाठवले; पेपर सुरू होण्यास तासाचा उशीर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेत दुसऱ्या दिवशीही गोंधळ उडाला आहे. विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी दिल्यामुळे विद्यार्थ्यांची सकाळी तारांबळ उडाली. या परीक्षा केंद्रावर बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स (BCS), बीएस्सी कम्प्युटर सायन्स (B.sc. compu) आणि बीएससीच्या (बायोटेक) परीक्षा सुरू आहेत. आज डेटा स्ट्रक्चर, सॉफ्टवेअर qwality अँड टेक्निक्स या विषयांचा पेपर सुरू होणार होता.

गेटच्या बाहेर उभे केले

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने परीक्षा केंद्रावर 500 विद्यार्थ्यांची यादी पाठवली. मात्र समाजकार्य महाविद्यालय या परीक्षा केंद्रात हॉल तिकीट असलेले 700 पेक्षा अधिक विद्यार्थी होते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सतीश सुराणा यांनी विद्यापीठाच्या यादीनुसार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिले. यादीत नाव नसलेले पण हॉल तिकीट असलेल्या विद्यार्थ्यांना मात्र गेटच्या बाहेर उभे केले. म्हणून 9 वाजता सुरू होणारा पेपर दहा वाजता सुरू झाला.

संवादाचा अभाव

सुमारे 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठाच्या कारभाराविषयी नाराजीचा सूर होता. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. गणेश मंझा यांनी म्हटले आहे की,' आम्ही काल रात्रीच अपडेट यादी पाठवली होती. परंतु महाविद्यालयीन आमच्यामध्ये संवाद होऊ शकला नाही. आता सर्व सुरळीत झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास उशीर झाला त्यांना वेळ वाढवून देण्यात येईल.'

बातम्या आणखी आहेत...