आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात काल श्रीकांत शिंदेंची सभा झाली. लाखोचा जनसमुदाय येणार असल्याची वल्गना कुठे गेली? म्हणत या सभेला न जमलेल्या गर्दीवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीकास्त्र डागले आहे.
विशेष म्हणजे या सभेला अर्धे मैदान रिकामे कसे होते, हे दानवेंनी पुराव्यासह सांगितले आहे. त्याचा एक व्हिडीओच त्यांनी पोस्ट केला आहे.
काय म्हणाले दानवे?
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, मैदान भरले नाही म्हणून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे चालू भाषणात खुर्च्या उचलण्याची वेळ काल रात्री आली. लाखोचा जनसमुदाय येणार असल्याची वल्गना कुठे गेली? लोकांना भाषण आवडले नसेल कदाचित, असा टोला लगावत अंबादास दानवेंनी एक ट्विट करून सत्तारांवर टीका केली आहे.
श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंना टोला
खासदार श्रीकांत शिंदे सिल्लोडमधील सभेत म्हणाले होते की, आमच्या सभेला परवानगी देत नसल्याचे सांगत काही लोकांनी प्रचंड गाजावाजा केला. त्यावर मी अब्दुल सत्तार यांना म्हणालो की, त्यांनी हव्या त्या मैदानावर सभा घेण्यासाठी परवानगी द्या. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले की, आपण त्यांना सगळे काही पुरवू पण लोक कुठून आणणार? जाहीर सभा घेण्यासाठी आपल्यावर प्रेम करणारी माणसे लागतात. ती आदित्य ठाकरे कुठून आणणार होते, असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी विचारला. यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी श्रीकांत शिंदेंनी घेतलेल्या सभेचा व्हिडिओ पोस्ट करत रिकाम्या खुर्च्या उचलण्याची वेळ कुणावर आली असा सवाल उपस्थित करताना लाखो लोक येणार असल्याची वल्गना गेली कुठे असा खोचक टोलाही शिंदे गटाला लगावला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.