आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिर्डी-त्र्यंबकेश्वर येथून दर्शन घेऊन मुंबईकडे घरी परतत असताना टायर फुटून दुभाजक ओलांडून कार दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनावर आदळल्याने मायलेकींसह चार जण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ हा अपघात घडला.
या अपघातात मनोरमा कौशिक (२८), खुशी कौशिक (६), रणजितकुमार कैलासनाथ वर्मा (३४, सर्व रा. खडकपाडा, ठाणे), चालक कबीर राजदत्त सोनवणे (३२, रा. बदलापूर, जि. ठाणे) यांचा मृत्यू झाला आहे. अनुजसिंग हे गंभीर जखमी आहेत. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास इगतपुरीजवळील पंढरपूरवाडीसमोर नाशिकहून मुंबईकडे जाणारी अॅसेंट (एमएच ०४, एफए ८२९१) कारचे पुढील टायर फुटल्याने ती थेट उडून दुसऱ्या बाजूच्या मुंब्रा येथून नाशिककडे अपघातग्रस्त कार घेऊन येणाऱ्या टोइंग व्हॅनवर (एमएच ४३, इडी ३०८८) जोरदार आदळली. त्यात कार चक्काचूर झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.