आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास घेऊन आत्महत्या:पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने घेतला गळफास

खुलताबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खुलताबाद तालुक्यातील गाेळेगाव येथे ४ आॅगस्ट राेजी घडली. याप्रकरणी खुलताबाद पोलिसांनी पती गणेश त्रिंबकेविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मीरा त्रिंबके (३६) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. मुंबईतील रहिवासी रामभाऊ इंगळे यांची मुलगी मीरा हिचा विवाह २००८ मध्ये गणेश त्रिंबके यांच्यासोबत झाला. या दांपत्याला मुलगा आणि मुलगी आहे. संसार सुरळीत सुरू असताना गेल्या २ वर्षांपासून गणेश त्रिंबके यास दारू पिण्याची सवय लागली. त्यातून गणेश हा दररोज दारू पिऊन पत्नी मीरा हिला मारहाण करून चारित्र्यावर संशय घेत हाेता. या त्रासाला कंटाळून तिने घराच्या छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जनार्दन मुरमे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...