आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीत बुडणाऱ्या तिघींपैकी दोघी बचावल्या:तिसगावच्या देवगिरी नदीला पूर, एक मुलगी बेपत्ता; थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तिसगावच्या देवगिरी नदीच्या पाण्यात कपडे धुताना अचानक पूर आल्याने महिला व मुली वाहून जात होत्या. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोघींना वाचवण्यात यश आले. मात्र एक 14 वर्षीय मुलगी पाण्यात वाहून गेली. या बेपत्ता मुलीचा शोध घेतला जात आहे. ही घटना रविवारी (ता.11) दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली.

जोरदार पावसामुळे पूर

वाळूज परिसरातील तिसगाव येथून देवगिरी नदी वाहते. देवगिरी किल्ल्यापासून येणारी ही नदी तिसगाव, सिडको वाळूज महानगर ते पंढरपूर जवळ खाम नदीला मिळते. या नदीच्या पात्रात ए. एस. क्लब जवळ राहणाऱ्या राजस्थानी महिला व मुली अशा तीन जणी कपडे धूत होत्या. रविवारी (ता.11) रोजी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे या नदीला मोठा पूर आला. त्यामुळे कपडे धुणाऱ्या तिघीजणी पाण्यात अडकल्या. त्यांनी एका झाडाचा सहारा घेत आरडाओरड केल्याने काही दक्ष नागरिकांची नजर त्यांच्याकडे गेली. लगेच त्यांनी धाव घेत वाहून जाणाऱ्या महिला व मुलींना पकडले. मात्र, एक मुलगी वाहून गेली. दरम्यान वाळूज अग्निशमन दलाचे पी. के. चौधरी, सी. आर. पाटील, एस. जी. महाले, वाय. डी. काळे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

यांना वाचवले

या पुरात वाहून जाणाऱ्या महिलेचे नाव हिरुबाई रघु जोगराणा (वय 50) व मुलीचे नाव नीतू कालू जोगराणा (वय 17) असे आहे. या दोघींना वाचवण्यात नागरिकांना यश आले. मात्र मुलगी या पोराच्या पाण्यात वाहून गेली. तिचे नाव राधा नागरी सापडा (वय 14) असे असून तिचा शोध सुरू आहे.

पोलिस कर्मचारी बालंबाल बचावला

तीन महिला पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस पोहचले. यावेळी एक पोलिस कर्मचारी महिलांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरले होते. मात्र, पाण्याचा वेग अधिक असल्याने तेही पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले होते. उपस्थित नागरिकांनी आणि इतर पोलिसांनी त्यांना पाण्याचा बाहेर काढल्याने ते बालंबाल बचावले.

बातम्या आणखी आहेत...