आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी 20 देशाची परिषद 2023 मध्ये भारतात होणार:औरंगाबादमध्येही होणार परिषदेचा इव्हेंट; जिल्ह्यात समितीने केली पाहणी

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जी २० देशाची शिखर परिषद २०२३ मध्ये भारतात होणार आहे. या निमित्ताने २० देशातले पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष यासह त्यांचे सचिव राजदूत आणि इतर खात्याचे विविध अधिकारी भारतात येणार आहेत. त्यासाठी देशातल्या विविध भागात या परिषदेसाठी आलेले अधिकारी, उद्योजक विविध खात्याचे लोक भेटी देणार आहेत. देशभरातल्या अनेक शहरात या निमित्ताने हे इव्हेंट केले जाणार आहेत.

कोणते देश सहभागी?

भारतात पहिल्यांदाचा जी २० या देशाची परिषद होणार आहे. यामध्ये अर्जेंटिना, आस्ट्रोलिया, ब्राझील, क‌ॅनडा, चीन, जर्मनी,जपान, फ्रान्स, भारत, इंडोनेशिया इटली, रशिया,दक्षिण अफ्रिका, दक्षिण कोरिया तुर्की आणि युनाटेड किग्डम हे देश यामध्ये असणार आहेत. या देशांचे प्रतिनिधी भारतात येणार आहेत.

वेरूळ, अजिंठाची पाहणी

परिषदेचे सचिव एल. के. बाबू यांनी शनिवारी वेरूळ आणि अजिंठाला भेट देत पाहणी केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. वेरूळ आणि अजिंठा लेणी पाहिल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले. या वीस देशातील लोकांना सांस्कृती कार्यक्रम तसेच हेरीटेज साइट देखील दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे औरंगाबादची निवड झाल्यास त्यांना वेरूळ आणि अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी देखील दाखवण्यात येणार आहेत.

उद्योजकांनी केले सादरीकरण

हॉटेल रामामध्ये या प्रतिनिधीसोबत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पोलिस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यासह उद्योजकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जी २० ची ही परिषद आठ महिने चालणार आहे. त्यामुळे या आठ महिन्यांत विविध देशातील लोक भारतात येणार आहेत. त्यामध्ये उद्योजकांचा देखील समावेश असणार आहे. याबाबत सीआयआयचे मराठवाडा प्रमुख प्रसाद कोकीळ यांनी सादरीकरण केले.

औरंगाबादच्या नावाची चर्चा

कोकीळ यांनी दिव्य मराठीशी बोलतांना सांगितले की, आम्ही औरंगाबादची बलस्थानाच्या बाबत त्यांना माहिती दिली. तसेच २० देशातल्या लोकांना इथे कनेक्टीव्हीटी कशी आहे, पर्यटन उद्योगाची स्थिती हॉस्पिटिलिटीची व्यवस्था त्यामध्ये असणाऱ्या सुविधा या सर्वांची माहिती दिली. औरंगाबादचा यामध्ये समावेश झाला, तर त्याचा फायदा होईल. या निमीत्ताने देशभर आणि जागतिक पातळीवर औरंगाबादच्या नावाची चर्चा होईल. तसेच उद्योगाबाबत देखील चर्चा होईल. त्याचा औरंगाबादच्या विकासासाठी फायदा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...