आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळ हीच समृद्धी!:कारने औरंगाबादहून मुंबईला जाऊन येण्यासाठी भरावा लागेल सुमारे 1211 रुपयांचा टोल, अवघ्या 175 मिनिटांत गाठता येईल मुंबई

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग पूर्णत्वाकडे वाटचाल आहे. या मार्गावर मुंबई ते नागपूर या दोन शहरांदरम्यान औरंगाबाद मध्यवर्ती शहर असेल. औरंगाबादहून मुंबईकडे जाणारी वाहने अधिक असतील. सध्या मुंबईला जाण्यासाठी रस्तेमार्गाने सात ते साडेसात तास लागतात. समृद्धी महामार्गामुळे हा वेळ निम्म्याहूनही जास्त कमी होईल. समृद्धीवरून औरंगाबाद ते मुंबई हे अंतर ३५० किलोमीटर असेल. सरासरी १२० किलोमीटर प्रतितास या वेगाने गेल्यास मुंबईत अवघ्या दोन तास ५५ मिनिटांत पोचणे शक्य होईल. मात्र, वेळेची बचत होणार असली तरी खिशाला मात्र अधिकची झळ सोसावी लागेल. या मार्गावर कारसाठी १.७३ रुपये एवढा प्रतिकिलोमीटर टोल असेल. म्हणजेच कारने औरंगाबादहून मुंबईला जाऊन येण्यासाठी एकूण १२११ रुपयांचा टोल भरावा लागेल. मल्टीअॅक्सल हेव्ही व्हेइकलसाठी प्रतिकिमी ११.१७ रुपये टोल आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंत रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात व शिर्डीजवळ गोदावरील नदीवरील पुलांचे काम बाकी आहे. शिर्डी ते मुंबई हा मार्ग पूर्ण होण्यासाठी अजून दीड वर्षे लागेल.

इंधन, मायलेज आदी बाबी पकडून कारने औरंगाबादहून मुंबईला जाऊन येण्यासाठी ६.५ हजारांचा खर्च टोल : औरंगाबादहून ३५० किमीच्या या मार्गावर कारला १.७३ रुपये प्रतिकिमीप्रमाणे टोल असणार आहे. म्हणजेच मुंबईला जाऊन येण्यासाठी १२११ रुपये टोल लागेल.

इंधनाचे मायलेज : या रस्त्यावर किमान ताशी सरासरी १२० किमीच्या वेगाने कार धावतील. हा वेग अधिक असल्याने कारचे मायलेज घटेल. एक लिटर पेट्रोलमागे सरासरी १६ किमी मायलेज गृहित धरले तर मुंबईला जाऊन येण्यासाठी ५ हजार १०४ रुपयांचे पेट्रोल लागेल.

एकूण खर्च : टोल व पेट्रोल मिळून कारने मुंबईवारीसाठी साडेसहा हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

कार/जीपसाठी प्रति किमी 1.73 रु. टोल
लाइट मोटर कमर्शिअल व्हेइकल ~2.79
हेव्ही व्हेइकल (बस/ट्रक) ~5.85
हेव्ही कमर्शिअल व्हेइकल ~6.38
हेव्ही कन्स्ट्रक्शन मशिनरी ~9.18
ओव्हरसाइज मल्टीअॅक्सल व्हेइकल ~11.17

आता लागतात ८ तास, समृद्धीने लागतील अवघे २ तास ५५ मिनिटे
औरंगाबादहून मुंबईला जाण्यासाठी पुणेमार्गे ४०० किमी तर नाशिकमार्गे ३७५ किमी अंतर आहे. समृद्धी महामार्गाने औरंगाबाद ते मुंबई ३५० किमीवर असेल. ताशी १५० किमी वेगमर्यादेच्या या मार्गावर कार सरासरी १२० च्या वेगाने धावतील. या वेगाने मुंबईला जाण्यासाठी २ तास ५५ मिनिटे लागतील. म्हणजे अंतर फार कमी होणार नसले तरी या मार्गामुळे मुंबईला जाणाऱ्यांचा तब्बल ४ ते ४.३० तासांचा वेळ वाचेल.

बातम्या आणखी आहेत...