आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंत्रणेची दमछाक:दिलेला शब्द पाळण्यासाठी शिंदेंनी लांबवला 5 तास दौरा, उत्तररात्री 3 वाजता मुंबईला रवाना

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बराच उशीर होतोय. त्यामुळे काही भेटीगाठी टाळता येतील का, असे काही जणांनी सुचवले. पण ज्यांना कबूल केले, त्यांच्याकडे जाण्यावर मी ठाम आहे. दिलेला शब्द पाळणारच, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी औरंगाबाद दौरा पाच तास लांबवला. अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ते रविवारी रात्री दहा वाजता दौरा संपवणार होते. प्रत्यक्षात ते सोमवारी उत्तररात्री साडेतीन वाजता मुंबईकडे रवाना झाले. या दौऱ्यामध्ये भाजप नेते, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

रविवारी पहाटे ५ वाजता दिल्लीहून विमानाने औरंगाबादला आलेले शिंदे आढावा बैठक, पत्रकार परिषद, व्यापारी महापरिषदनेनंतर सिल्लोडला गेले. तेथे त्यांचे वेळापत्रक कोलमडले आणि ते सायंकाळी सातऐवजी रात्री १० वाजता टीव्ही सेंटर चौकात आले. छत्रपती संभाजी महाराज आणि पुढे साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यालयात पोहोचले. तेव्हा काही जणांनी वेळ वाचवण्याचे सुचवले. पण मुख्यमंत्र्यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. मी शब्द दिला आहे. कितीही उशिर झाला तरी तो मोडणार नाही. असे त्यांनी स्पष्ट केले. या दौऱ्यामुळे पोलिस यंत्रणेची दमछाक झाली.

शिवसेना संपू देणार नाही रात्री १ वाजता ते कोकणवाडीत आमदार संजय शिरसाटांच्या कार्यालयात पोहोचले. अहल्यादेवींंच्या पुतळ्यास अभिवादान केले. तेथील सभेत त्यांनी ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर चालणारी शिवसेना संपू देणार नाही, विकासासाठी पूर्ण मदत करू’ असे सांगितले. मग आमदार संदिपान भुमरे यांच्या कार्यालयाला भेट देऊन ते २.३० वाजता ज्योतीनगर येथे आमदार अतुल सावे यांच्या निवासस्थानी पोहोचले.

सावेंच्या घरी लगीनघाई आमदार सावेंच्या निवासस्थानाबाहेरील हिरवळीवर रात्री ९ वाजेपासून भोजनसत्र सुरू होते. सावे यांच्या पत्नी अंजली, बंधू अजित व अनिल सपत्नीक, मुले अजिंक्य, अनुराग, मित्र अनिल मकरिये, भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर लग्नकार्यासारखे झटत होते. रात्री ३ वाजता मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. भोजन करून ते ३.३० वाजता मुंबईला रवाना झाले. पूर्ण दौऱ्यात भाजपचे केंद्रीय मंत्री डाॅ. कराड, दानवे यांच्यासह स्थानिक नेते मुख्यमंत्र्यांसोबत होते.

बातम्या आणखी आहेत...