आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाणसाकडे सर्वकाही असूनही मानसिक सुख नाही. हे मानसिक दारिद्र्य दूर करणे आवश्यक आहे. यातूनच आनंदी जीवन जगता येऊ शकेल. त्यासाठी संत साहित्याची जीवनाला जोड द्यावी, असे प्रतिपादन विजयकुमार फड यांनी केले.सिडको एन-६ येथील संभाजी कॉलनी भागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या वेळी विजयकुमार फड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मानवी जीवन आनंदाने घालवण्यासाठी संतसाहित्याची जोड असणे आवश्यक आहे. संत मार्गदर्शनामुळे घरातील वातावरण आनंदी असते. त्यासाठी आपले आचार-विचार चांगले असायला पाहिजेत.
आपली मुले आपलेच अनुकरण करतात. त्यासाठी मोठ्यांचे विचार शुद्ध असणे गरजेचे आहे. आज आर्थिक दरिद्रयता राहिलेली नाही, मात्र मानसिक दरिद्र्यता दिसून येते. मानसिक आजाराने अनेक जण व्यसनाकडे जात आहेत. यातूनही बाहेर पडण्यासाठी आणि आनंदी जीवनासाठी संतसाहित्याची जोड आवश्यक असल्याचे त्यांनी भाविकांना ज्ञानेश्वरीतील दाखले देत सांगितले. या वेळी फड म्हणाले की, आज एकमेकांशी बोलायला वेळ नसल्याने माणुस एकटा पडत आहे. त्यामुळे तो व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे संवाद वाढविणे काळाची गरज बनली आहे. नेहमी चांगले वागावे. सत्या बोलावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.