आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुपदेशन:तरुणांच्या नैराश्यावर मात करण्यासाठी आई मेळावा, पालकांसह मुलांचे होणार समुपदेशन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातून बीकॉम शिकण्यासाठी शहरात आलेल्या एका मुलीला आपल्याला पुढे खरंच काही करता येईल का, हा प्रश्न नेहमी सतावत होता. कॉलेजच्या हॉस्टेलवर राहतानाही ती स्वत:शी, मैत्रिणींशी हाच प्रश्न सातत्याने विचारायची. समाधानकारक उत्तर मिळू न शकल्याने अखेर त्या युवतीने जीवनयात्रा संपवली... हे एक उदाहरण झाले. मात्र समाजमन सुन्न करणाऱ्या अशा अनेक दुर्घटना शहर व जिल्ह्यात सातत्याने घडत आहेत. नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या अशा तरुणाईला यातून बाहेर काढण्यासाठी देवगिरी कॉलेजने पुढाकार घेत २० सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता आई मेळाव्याचे आयोजन केले आहे.

उपप्राचार्य एन. जी. गायकवाड यांनी सांगितले, ‘मुलं ही सर्वाधिक आईच्या जवळ मन मोकळं करत असतात. त्यामुळे अशा नैराश्यात अडकलेल्या मुलांना पालकांनी समजून घेणे, पाठबळ देणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा पालक सभेसाठी आईवडिलांना येण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे मुलांच्या वर्तनातील बदल त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. या सर्व समस्यांतून मार्ग काढण्यासाठी आम्ही आई मेळाव्याचे आयोजन केले आहे.

काय करणार मार्गदर्शन
आयुष्य हे सुंदर आहे. प्रत्येक अडचणीवर मात करता येते. त्यासाठी व्यक्त होणे, संवाद साधणे आवश्यक आहे.
बऱ्याच वेळा विद्यार्थी आत्मकेंद्री बनतात. आपल्याला कुणी समजून घेत नाही असा त्यांचा ग्रह असतो. त्यांनी मोकळेपणाने बोलावे, त्यांचे प्रश्न पालकांनी समजून घ्यावेत.मुले आईजवळ मनमोकळे बोलतात, तसेच त्यांनी सातत्याने मन मोकळे केले पाहिजे, म्हणून या मेळाव्याला आई नाव दिले.

बातम्या आणखी आहेत...