आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोटरी इस्टतर्फे डॉ. दिक्षितांच्या व्याख्यानाचे आयोजन:थॅलेसिमियाग्रस्त मुलांना मदत करण्यासाठी सत्यसाई ब्लड सेंटरसाठी निधी उभारणार

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात 49 ज्येष्ठांचा सांभाळ करत त्यांना वैद्यकीय सेवा देणारी स्नेहसावली संस्था आणि 104 हून अधिक थॅलेसिमियाग्रस्त मुलांना मदत करणाऱ्या सत्य साई ब्लड सेंटर या दोन्ही संस्थांसाठी आर्थिक मदत उभी करण्यासाठी रोटरी क्लब इस्टच्यावतीने 27 नोव्हेंबरला डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. तापडिया नाट्यमंदिरात सायंकाळी 4 ते 6 वाजेदरम्यान हा कार्यक्रम होईल.

या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत रोटरीचे डिस्ट्रीक्ट गर्व्हनर रुख्मेश जखोटिया, क्लबच्या अध्यक्ष अ‍ॅड. संगीता तांबट, डिस्ट्रिक पब्लिक इमेज चेअरमन प्रमोद झाल्टे, कोषाध्यक्ष पवन गुट्टे, क्षितीज चौधरी आणि सत्यसाई ब्लड सेंटरचे डॉ. महेंद्रसिंग चव्हाण उपस्थित होते.

तांबट म्हणाल्या, रोटरी अत्यंत जाणीवपुर्वक सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. त्यामुळे 49 आजारी वृद्धांची काळजी घेणारी स्नेहसावली सेंटर आणि 104 हून अधिक थॅलेसिमियाग्रस्तांना मदत करणारी सत्यसाई ब्लड सेंटर या दोन संस्थांच्या मदतीसाठी हे आहे.

काय म्हणाले जखोटिया ?

जखोटिया म्हणाले, रोटरी महिला सक्षमीकरणासाठीही मदत करते. डॉ. दिक्षित यांच्या व्याख्यानात ते महिलांनी कुटूंबाचा आणि स्वत:चा आहार कसा ठेवावा याबद्दल मार्गदर्शन करतील. योग्य आहाराने उर्जा वाढते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

समाजाने संवेदनशील होणे गरजेचे

डॉ. महेंद्रसिंग म्हणाले, आमच्या सेंटरच्या माध्यमातून फक्त थॅलेसिमियाग्रस्तांना उपचार दिले जातात असे नाही, तर या आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी समुपदेशन, विवाहपुर्व आरोग्य तपासणी आणि विवाह झालेला असल्यास थॅलेसिमियाग्रस्त मुल जन्माला येऊ नये म्हणून उपाययोजना केली जाते. या आजारातील रुग्णांचे जीवन अतिशय जोखमीचे आणि संघर्षाचे असते. त्यामुळे याकडे समाजाने संवेदनशील होणे गरजेचे आहे.

दात्यांनी सढळ हाताने मदत करावी

झाल्टे म्हणाले, या व्याख्यानप्रसंगी दात्यांनी सढळ हाताने मदत करावी, अशी अपेक्षा आहे. डॉ. दिक्षितही दोन्ही संस्थांना मदत म्हणून कोणतेही मानधनाविना व्याख्यान देणार आहेत.

याठिकाणी मिळतील पास

उस्मानपुऱ्यातील गंगा मेडिकल, बीड बायपास रेणुकामाता कमानीजवळ ग्लाेबल पेस्ट कंट्रोल,शहागंज मित्तल खादी भंडार, सिडकोतील जय टॉवर्स आणि एन - 5 येथील सत्यासाई ब्लड सेंटर याठिकाणी पास मिळतील.

बातम्या आणखी आहेत...