आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या सोडवणार : मंत्री छगन भुजबळ

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या दुकानांवर स्वस्त धान्याशिवाय काही वस्तू विकण्यास परवानगी देण्यात आली असून त्यात स्टेशनरीचा समावेश आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मंत्रालयात अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघांची छगन भुजबळ यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीस अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पुष्पराज देशमुख, राज्य संघटना अध्यक्ष डी. एन. पाटील, उपाध्यक्ष राजेश अंबुसकर, चंद्रकांत यादव, विजय पंडित, प्रभाकर पाडले, काका देशमुख, प्रल्हाद मोदी, विश्वंभर बसू, चंद्रकांत यादव यांच्यासह राज्यभरातून आलेले स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. स्वस्त धान्य दुकानदारांना धान्याव्यतिरिक्त अन्य पदार्थ विकायला सरकारने परवानगी दिली आहे. त्यात स्टेशनरी, शाम्पू, साबण, डिटर्जंट, हँडवॉश, चहापत्ती, कॉफी या वस्तूंचा समावेश आहे. येणाऱ्या काळात आणखी काही गोष्टींचा समावेश करण्यात येणार आहे. दुकानदारांच्या अन्य मागण्यांबाबत आगामी काळात बैठक घेऊन ते प्रश्नही तातडीने सोडवू, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...