आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात गोवरचा उद्रेक वाढतच आहे. रविवारी आणखी सहा संशयित बालके आढळली. आतापर्यंत संशयित बालकांची संख्या १०५ झाली आहे. उद्रेक झालेल्या भागात ५ डिसेंबर रोजी अतिरिक्त नऊ लसीकरण शिबिरे भरवण्यात येणार असल्याचे मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
चिकलठाणा, नेहरूनगर, बायजीपुरा, विजयनगर, गांधीनगर, नक्षत्रवाडी, नारेगाव, मिसारवाडी, भीमनगर, सातारा, बन्सीलालनगर, भवानीनगर, जयभवानीनगर या भागात साथ झपाट्याने पसरत असल्याने संशयित व बाधित बालकांची संख्या वाढत आहे. शनिवारपर्यंत संशयित बालकांची संख्या ९९ वर पोहोचली होती. मागील दोन दिवसांत एकाही बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही. मनपाची आरोग्य यंत्रणा शहरात सर्वत्र सर्वेक्षण करत आहे. आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन चौकशी करत आहेत. त्यातच रविवारी आणखी सहा संशयित बालके आढळून आली. या बालकांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथे हाफकिन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. गोवर साथीला नियंत्रणात आणण्यासाठी सोमवारी चिकलठाणा, नेहरूनगर, विजयनगर, नक्षत्रवाडी या भागात प्रत्येकी दोन, तर भवानीनगरात एक लसीकरण शिबिर घेतले जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.