आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागीय आयुक्तालयात घेणार आढावा:‘जी 20’च्या तयारीसाठी आज डॉ. कराड घेणार तिसरी बैठक

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘जी २०’ ची परिषद फेब्रुवारी महिन्यात भारतात होणार आहे. यानिमित्ताने विदेशातील काही सचवि दर्जाचे अधिकारी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर शहरात येणार आहेत. या शहरात त्यांच्या काही बैठकाही होणार आहेत. या निमित्ताने केंद्र व राज्य सरकारने चारही शहरांत विकासकामे करण्याचे नियोजन केले आहे.

औरंगाबादेत प्रथमच अशा प्रकारची बैठक होत असल्याने प्रशासन कामाला लागले आहे. यापूर्वी विभागीय आयुक्तालयात दोन बैठका घेण्यात आल्या आहेत. आता शनविारी (३ डिसेंबर) केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे. यात आतापर्यंत नियोजन केलेल्या कामांचा आढावा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांकडून डॉ. कराड नियोजनाची माहिती घेणार आहेत. तसेच कोणती कामे प्राधान्याने करायची, कोणत्या कामांसाठी तातडीने निधी हवा आहे, याबाबतही माहिती घेऊन केंद्राकडे पाठपुरावा करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...