आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभियांत्रिकी प्रवेश आता अंतिम टप्प्यात आले आहेत. तिसऱ्या फेरीसाठी ९ नोव्हेंबर रोजी रिक्त जागांची उर्वरित गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १० ते १२ नोव्हेंबरदरम्यान दिलेल्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. मात्र, स्पॉट अॅडमिशनचे शेड्यूल १३ ते २० नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे.
सीईटी सेलमार्फत २१ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणीने सुरू झालेले अभियांत्रिकी प्रवेश आता संपण्याच्या मार्गावर आहेत. पहिली फेरी ७ ऑक्टोबरपासून सुरू झाली होती. आता ९ नोव्हेंबरला कॅप-१, कॅप-२ मधून रिक्त राहिलेल्या जागांची गुणवत्ता यादी ९ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीनमधून ऑफर झालेल्या सीट्सवर १० ते १२ तारखेला प्रवेश घेता येईल. त्यासाठी ऑनलाइन शुल्क अदा करून हार्डकॉपी संबंधित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन सादर करणे अनिवार्य आहे. तिसऱ्या फेरीचा समारोप १२ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता होणार आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट लेव्हलच्या प्रवेशाला सुरुवात होईल. इन्स्टिट्यूट लेव्हल म्हणजेच, स्पॉट अॅडमिशन १३ ते २० नोव्हेंबरदरम्यान होतील.
त्यासाठी संबंधित कॉलेजला त्यांच्याकडे रिक्त राहिलेल्या अभ्यासक्रमनिहाय जागांची यादी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी लागणार आहे. सीईटीमध्ये भाग घेतलेल्या पण नॉन झीरो स्कोअर असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर आलेल्या अर्जानुसार गुणवत्ता यादी नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करावी लागणार आहे. सामाजिक आरक्षण आणि सीईटी सेलच्या नियमानुसार प्रवेश दिले जातील. नंतर कॉलेजला त्यांच्याकडे झालेले प्रवेशाचे संपूर्ण डिटेल्स ऑनलाइन अपलोड करून द्यावे लागतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.