आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखे गिफ्ट:क्रांती चौक पंपावर आज पेट्रोल 54 रुपये लिटर ; मनसेकडून अनोखे गिफ्ट : वेळ सकाळी 8 ते 9

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून मंगळवारी (१४ जून) शहरातील पहिल्या एक हजार वाहनधारकांना फक्त ५४ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल विक्री करण्यात येणार आहे. क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर सकाळी आठ ते नऊ या एक तासाच्या वेळेत हा उपक्रम राबवला जाणार आहे. सकाळी दहा वाजता सुपारी हनुमान गुलमंडी येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी दिली. या उपक्रमासाठी स्वतंत्र रांग असेल. फक्त एक हजार दुचाकीस्वारांनाच कुपन दिले जाईल, त्यांनाच सवलतीच्या दरात पेट्रोल मिळेल. सकाळी नऊच्या आत अधिक दुचाकीस्वार आले तर कुपनची संख्या वाढवण्यात येईल. पेट्रोलचा दर सध्या प्रतिलिटर ११३ लिटर रुपये आहे. क्रांती चौक पंपावर ५४ रुपये वाहनचालकांनी द्यायचे उर्वरित ५९ रुपयांचा फरक मनसे पंपचालकांना देणार आहे, असे खांबेकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...