आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज जागतिक पुस्तक दिन:कोरोनासारख्या कठीण काळात पुस्तकांचीच साथ; जुन्या बेस्ट सेलर, सकारात्मकता निर्माण करणाऱ्या पुस्तकांना आजही चांगली मागणी

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुस्तकांचे महत्त्व कळले, भावनिक काेंडी दूर हाेतेय

कोरोनाच्या कठीण काळात ग्रंथप्रदर्शन, शाळा-कॉलेज बंद आहेत. परंतु मागील वर्षीच्या लॉकडाऊनपासून लोकांना पुस्तकांचे महत्त्व कळले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली मानसिक आणि भावनिक अवस्था पाहता सकारात्मक विचार निर्माण करणारे आणि कठीण परिस्थिती सक्षमपणे उभे राहण्यासाठी वैचारिक बळ या पुस्तकांमुळेच मिळत असल्याचे साहित्यिक आणि पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले. आजही वाचनाचा विषय निघाला की, शाळेतील मुले किंवा मोठे आम्ही कुठली पुस्तके वाचावी, असे विचारले की, तुम्हाला हवं ते वाचा, असे सांगितले जाते.

२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन. वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय हा पुस्तक दिन पोरकाच. पुस्तकांचे वाचन कमी झाले असे म्हणणारे असले तरी ते खरे नाही. हे पुन्हा एकदा कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे सिद्ध झाले आहे. माध्यम आणि वाचकांची आवडनिवड बदलली आहे. परंतु आजही जुनी बेस्ट सेलर आणि सकारात्मकता निर्माण करणारी पुस्तके वाचली जात आहेत. पुस्तकांची या कठीण काळात साथ मिळाल्याचे साहित्यिक सांगतात.

पुस्तकांचे महत्त्व कळले, भावनिक काेंडी दूर हाेतेय
आज दुकाने बंद आहेत. व्यवहार ठप्प आहेत. परंतु याच लॉकडाऊनमुळे पुस्तकांचे महत्त्वदेखील वाचकांना लक्षात आले. मागील लॉकडाऊनमध्ये आलेला एकटेपणा, मानसिक आणि भावनिक कोंडी लक्षात घेता वाचक ऑनलाइन पुस्तके मागवत आहेत. - शशिकांत पिंपळापुरे, प्रकाशक

ऑनलाइन विक्रीत वाढ, तीनपट वाचक वाढला
वाचकांचा प्लॅटफॉर्म बदलला आहे. ऑनलाइन विक्रीत वाढ झाली आहे. मागील वर्षी तर तीनपट वाचक वाढला. पुस्तकांची ऑनलाइन मागणी वाढली आहे. कोरोनामुळे सकारात्मकता निर्माण करणारी पुस्तकेदेखील मोठ्या प्रमाणात वाचक मागवतोय. ठराविक पुस्तकांची मागणीदेखील कायम आहे. - साकेत भांड, प्रकाशक

पुस्तकांचाच माेठा अाधार
आजची सामाजिक परिस्थिती पाहता एक साहित्यिक म्हणून आणि वाचक म्हणूनही पुस्तकांची साथ, त्यांची मैत्री या काळात मोठा आधार वाटते. मोठ्यांसह लहान मुलांचे जीवन बंदिस्त झाले आहे. या वातावरणात पुस्तकरूपी मित्राची मदत होते. लेखक, कवींनी वाचकांना चांगली पुस्तके देण्याची जबाबदारी वाढली आहे. अनेक विषय या कोरोनाकाळामुळे समोर आले आहेत. माणसाच्या जगण्याची आणि माणूस म्हणून माणसाला समजून घेण्याची परिभाषादेखील आता बदलली आहे. - लीला शिंदे,़ बालसाहित्यिक

जग समजावून घेता अाले
आजही पुस्तकांना प्राथमिक स्तरावर छंद म्हणूनच पाहिले जाते. परंतु पुस्तके ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू विकसित करण्याचे काम करत असतात. कोरोना काळात घराच्या बुकशेल्फमध्ये असलेल्या पुस्तकांचीच साथ मिळाली. अजून जवळून हे पुस्तकांचेे जग समजून घेता आले. - संदीप जगदाळे, कवी

बातम्या आणखी आहेत...