आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासन परिपत्रकानुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी महानगरपालिका स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने जानेवारी २०२३ च्या महानगरपालिकास्तरीय लोकशाही दिन बैठक २ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक मतदारसंघाचे निवडणूक घोषित झाल्याने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामुळे २ जानेवारी रोजी होणारी महानगरपालिकास्तरीय लोकशाही दिन बैठक रद्द करण्यात येत आहे. मनपाच्या जनसंपर्क विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.