आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपगात:चिमुकलीचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू ; जिन्सी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाल्कनीत खेळत असताना दुसऱ्या मजल्यावरून खाली पडलेल्या ६ वर्षीय चिमुकलीचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आदिबा खान सादिक खान असे तिचे नाव आहे. जिन्सी परिसरातील संजयनगरातील आदिबा उर्दू शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत होती. आदिबाने सोमवारी दुपारी शाळेतून आल्यानंतर जेवण केले. त्यानंतर ती नेहमीप्रमाणे बाल्कनीत खेळत हाेती. यादरम्यान, आदिबा कडेला गेली व तिचा ताेल जाऊन ती थेट जमिनीवर कोसळली. पहिले तिला एमजीएममध्ये दाखल केले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने नंतर घाटीत हलवल्यानंतर ७ दिवसांच्या उपचारानंतर रविवारी पहाटे ४ वाजता तिचा मृत्यू झाला. जिन्सी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली. अंमलदार व्ही. एस. शहाणे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...