आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्यांचे सर्वपक्षीयांशी स्नेहाचे बंध:आम्ही सर्व मिळून तुमचे प्रश्न सोडवू; राजकीय नेत्यांची व्यापाऱ्यांना ग्वाही

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील व्यापाऱ्यांनी सर्व पक्षातील नेत्यांशी, कार्यकर्त्यांसोबत स्नेहबंध रुजवलेले आहेत. असे गौरव उदगार पालकमंत्री, सहकारमंत्री, आजीमाजी आमदारांनी काढले. त्यामुळे सर्व मिळून तुमचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याची सर्वांनीच प्रामाणिकपणे ग्वाही देऊन प्रेमाचे ऋृणानुबंध अधिक दृढ करण्याचा संकल्प केला.

दि. जनरल किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने 20 नोव्हेंबरला सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत जुना मोंढा येथील ब्राथी तेली समाजाच्या सभागृहात दिवाळी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबर्सचे अध्यक्ष मानसिंग पवार, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार हरीभाऊ बागडे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, निलेश सेठी, संजय कांकरीया, तनसुख झांबड, आदेशपालसिंग छाबडा, राजू शिंदे, जगन्नाथ काळे, मनसुखलाल बाठीया आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सेठी यांनी केले. तर आभार शिवशंकर स्वामी यांनी मानले. यावेळी सतत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यापाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, पुस्तक, माळ देऊन गौरव करण्यात आला.

माझे वडील खासदार होते तेव्हा व्यापाऱ्यांच्या घरी जावून दिवाळीच्या शुभेच्छा देत होते. आज दिवाळी स्नेहसंमेलन होतय व मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे, याचा आनंद होतोय. व्यापाऱ्यांचा सर्वांसोबतच स्नेह असतो. त्यामुळेच आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर मात करण्यात आपण आग्रेसर राहीलो. असे सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले.

व्यापार उद्योगाला चालना व बेरोजगारांच्या हाताला कम उपलब्ध करून देणे हे सरकारच कामच आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. मी तुमच्या पाठीशी उभे आहे. अशी ग्वाही पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...