आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन‎:विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांनी‎ एकत्र; विद्यापीठात अग्निपथ विरोधात‎ विद्यार्थी संघटनांचे आंदोलन‎

औरंगाबाद‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद‎ केंद्र सरकारने लष्करभरतीसाठी‎ नवीन अग्निपथ योजनेची मोठी‎ घोषणा केली आहे. मात्र, या‎ योजनेविरोधात डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात‎ सोमवारी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय‎ इमारतीसमोर आंदोलन केले.‎ विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांनी‎ एकत्र येत अग्निपथ योजनेला विरोध‎ केला. ''स्टॉप द अग्निपथ'' अशी‎ घोषणा देत नवीन अग्निपथ योजना‎ तत्काळ रद्द करावी, अशी मागणी‎ केली. दरम्यान, बेगमपुरा पोलिसांनी‎ आंदोलकांना ताब्यात घेतले.‎

संघटनांनी म्हटले की, गेल्या पाच‎ वर्षांपासून केंद्र सरकारने‎ लष्करभरती राबवलेली नाही.‎ अशातच केंद्र सरकारने‎ लष्करभरतीची तयारी करणाऱ्या‎ तरुणांचा अपेक्षाभंग केला असून‎ केवळ चार वर्षांसाठी‎ लष्करभरतीसाठी नवीन अग्निपथ‎ योजना आणली आहे. या अग्निपथ‎ योजनेची संरक्षणमंत्री राजनाथसिंह‎ यांनी नुकतीच घोषणा केली आहे.‎ मात्र, या योजनेला देशभरातून प्रचंड‎ विरोध होत आहे. या आंदोलनाचे‎ पडसाद सोमवारी विद्यापीठात‎ पाहायला मिळाले. एसएफआय,‎ सत्यशोधक, राष्ट्रवादीसह इतर‎ विद्यार्थी संघटनांनी अग्निपथ‎ योजनेविरोधात जोरदार आंदोलन‎ केले. या वेळी विद्यापीठातील काही‎ विभागही संघटनेच्या‎ पदाधिकाऱ्यांनी बंद केले होते.‎ विद्यापीठाच्या प्रशासकीय‎ इमारतीसमोर आंदोलन करणाऱ्यांना‎ पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

बातम्या आणखी आहेत...