आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराेग्य विभाग:स्वाइन फ्लूनंतर टोमॅटो फीव्हर ; 6 वर्षांखालील मुलांना धाेका

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा संसर्ग कमी हाेत नाही ताेच आता स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्याची तयारी सुरू असतानाच ‘टोमॅटो फीव्हर’चे संकट निर्माण झाले आहे. सहा वर्षांपेक्षा लहान मुलांना या आजाराचा सर्वाधिक धोका आहे. विशेष म्हणजे टोमॅटो व्हायरससदृश आजाराचे रुग्ण आता रुग्णालयात येण्यास सुरुवात झाल्याची माहिती बालरोगतज्ज्ञांनी दिली. या आजारात जिवाला धोका नाही, किमान पाच ते सात दिवस याचा संसर्ग राहतो. वेळेवर योग्य उपचार घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. टोमॅटो फ्लूमध्ये प्रामुख्याने ताप येतो. अशी मुले दुसऱ्या मुलांच्या संपर्कात आल्यास त्यांनाही संसर्ग होण्याची शक्यता आहे. शरीराच्या अनेक भागात फोड किंवा जखमा दिसू लागतात. या फोडांचा आकार सामान्यतः लाल असतो. म्हणून त्याला टोमॅटो फ्लू असे नाव दिले आहे.

अशी आहेत लक्षणे
शरीरावर लाल फोड येणे, त्वचेत जळजळ आणि खाज सुटणे, जुलाब, थकवा, सांधेदुखी आणि शरीरात वेदना, उच्च ताप, हात, गुडघे आणि नितंबांचा रंग बदलणे, पोटात तीव्र वेदना होणे, उलट्या आणि अतिसार, सर्दी
व खोकला.

आजार कांजण्यासारख्या, अंगावर येतात पुरळ
हा आजार कांजण्यासारख्या आहे. हात, पाय आणि तोंडावर लाल पुरळ येतात. अशी लक्षणे असलेल्या मुलांना शाळेत पाठवू नये. लहान मुलांसाठी आवश्यक असलेल्या सर्व लस घ्याव्यात.
- डॉ. रवी सावरे, बालरोगतज्ज्ञ.

ही काळजी घेणे आवश्यक
मुलांची आणि घराची स्वच्छता ठेवणे, पाणी उकळून पिणे, लहान मुलांना आवश्यक असलेल्या लसी देणे, पाणी जास्त पिणे, मुलांमध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास योग्य उपचार घेणे, मुले किंवा ज्या लोकांना संसर्ग झाला आहे त्यांनी फोड फोडणे आणि खाजवणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...