आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीचा प्रयत्न:माळीवाड्यात टाॅमी गँगने 12 दुकाने फाेडली ; चोरटे सीसीटीव्हीत कैद असूनही सापडले नाहीत

दौलताबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माळीवाड्यातील एकाच रात्री १२ दुकाने फोडत टाॅमी गँगने पोलिसांना आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे दहा महिन्यांपूर्वी याच कॉम्लेक्सच्या मागे घर फोडण्याचा प्रयत्न झाला हाेता. या वेळी चोरटे सीसीटीव्हीत कैदही झाले. मात्र, पोलिसांनी कारवाई न केल्याने चोरट्यांनी ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ दुकाने फोडली. विशेष म्हणजे गणेशोत्सवानिमित्त रात्रभर पोलिसांची गस्त सुरू असताना चाेरट्यांनी धुमाकूळ घातला.

आढाव कॉम्पलेक्समधील ८, तर गावातील तीन दुकाने फोडली. यात सुरेश पल्हाळ यांचे पूजा मेडिकल, सुदर्शन मोबाइल शॉप, मॅचवेल कापड दुकान, प्रकाश राऊत यांचे कटिंग सलून, विजय सुलाने यांचे बॅटरी व इलेक्ट्रॉनिक दुकान, संतोष मुळे याचे टायर रिमोल्ड दुकान, सचिन रहाने यांचे खताचे गोडाऊन, सर्वज्ञ कृषी सेवा यांचे दोन खताचे गोडाऊन, दोन लॉटरीची दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाला. प्रत्येक दुकानाचे शटर टाॅमी किंवा लोखंडी रॉडच्या साह्याने उचकटवून फोडल्याचा अंदाज पाेलिसांनी वर्तवला. या वेळी ठसेतज्ज्ञांना बोलवले होते. या भागातील सीसीटीव्हीची पाहणी केली.

चार हजारांचा मुद्देमाल लंपास : सुदर्शन मोबाइल शॉपचे कृष्णा नाईक यांच्या मोबाइल दुकानातून एक लॅपटॉप, मोबाइलचे सुटे सामान असा एकूण चार हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला, तर साड्यांच्या दुकानातून महागड्या साड्या नेल्या. आता यापुढे गस्त वाढवणार असल्याची माहिती निरीक्षक शिवाजी तारे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...