आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गंगाखेड नगरपालिकेतील विकास कामांना प्रशासकीय मान्यतेसाठी ४ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी मागणी करून ती स्वीकारल्या प्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह एक अभियंता व एक अव्वल कारकुनास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मंगळवारी ताब्यात घेतले. प्रशासकीय मान्यतेसाठी पालिकेने नगर प्रशासन विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यासाठी एक नगरसेवक सूर्यवंशी यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. मात्र प्रस्तावाच्या एकूण रकमेच्या दीड टक्केप्रमाणे ४ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी सूर्यवंशी यांनी कर्मचाऱ्यांमार्फत केली होती, अशी तक्रार संबंधित नगरसेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर सोमवारी पथकाने पडताळणी केली. त्यात नगर प्रशासन विभागातील अव्वल कारकून श्रीकांत विलासराव करभाजने व स्थापत्य अभियंता अब्दुल हकीम अब्दुल खयुम यांनी निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून ४ लाख ५० हजारांची मागणी केल्याचे केल्याचे स्पष्ट झाले. पथकाने दोन्ही कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.