आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानौकरी किंवा कामाला लावून देण्याचे आमिष दाखवत गरिब महिलेवर बलात्कार करुन तीची परस्पर परराज्यातील व्यक्तींसह लग्न लावून तिची विक्री केल्या प्रकरणात अटकेत असलेल्या चौघा आरोपींना 13 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.जी. गुणारी यांनी दिले.
हारुण खान नजीर खान (40, रा. बिसमिल्ला कॉलनी, निसारवाडी), शबाना हारुण खान (36, रा. बेरीबाग, हर्सुल), बन्सी मुलाजीराम मेघवाल (50, रा. बोरानाडा ता.जि. जोधपुर, राजस्थान) आणि लिलादेवी जेठराम मेघवाल (42, रा. आरतीनगर पाल, बोरानाडा ता.जि. जोधपुर राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत.
प्रकरणात 30 वर्षीय विवाहीतेने फिर्याद दिली. त्यानूसार पीडिता ही एका हॉटेलवर धुण्या-भांड्याची काम करते. पीडितेच्या घरची परिस्थिती हालाकीची असल्याने ती कामाच्या शोधात होती. नोव्हेंबर 2022 मध्ये पीडिता आरोपी शबाना पठाण हिच्या संपर्कात आली. तिने पीडितेला काम लावून देण्याचे आमिष दाखवले. 18 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पीडिता ही दौलताबाद येथे मतदान करण्यासाठी गेली होती. त्यावेळी शबाना आणि तिचा पती हारुण पठाण या दोघांनी तिला काम दाखविण्याचे आमिष दाखवत फुलंब्री येथील एका हॉटेलात आणले. पीडितेला जेवणात गुंगीचे औषध देवून हारुण याने तिच्यवर बलात्कार केला, व तिचे चित्रकरण केले. त्याच चित्रीकरणाच्या जोरावर आरोपी शबाना, हारुण आणि विकास यांनी पीडितेला ब्लॅकमेल करुन 19 नोव्हेंबर 2022 रोजी कारने जोधपुर येथील एका हॉटेलवर आणले.
त्यावेळी छत्रपती संभाजीनगरातील आणखी चार महिला तेथे आणलेल्या होत्या. त्यानंतर बन्सीलाल, मनोज आणि महाविर अशा तिघांनी वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या हॉटेलवर नेऊन पीडितेवर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर शबाना व लिलादेवी मेघवाल या दोघांनी पीडितेला मारहाण करुन तसेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, दिनेश भादु (रा. जोधपुर) याच्याशी लग्न लावण्याचे भासवून पीडितेला दोन लाख 80 हजार रुपयांत विक्री केले. त्यानंतर पुन्हा दोन महिन्यांनी शबाना, हारुण आणि लिलादेवी या तिघांनी पीडितेची तीन वेळा विक्री केली. 3 फेब्रुवारी 2023 रोजी वरील आरोपी पुन्हा पीडितेची विक्री करणार असल्याची कुणकुण पीडितेला लागली. संधी साधत पीडितेने आपली सुटका केली. प्रकरणात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वरील आरोपींना अटक करुन त्यांची चौकशी केली असता शबाना हिने गुन्ह्याची कबुली देत, पीडितेला विक्री करुन मिळालेल्या दोन लाख 80 हजार रुपयांपैकी प्रत्येकी तीस हजार रुपये, लिलादेवी आणि बन्सी मेघवाल यांना दिले. तर 54 हजार रुपये पती हारुण याच्या बँक खात्यात जमा केले. तर उर्वरित पैशांमधून उधारी दिले आणि खर्च केल्याची माहिती दिली. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करायची आहे. गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करायची आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.