आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा अचानक रद्द झाला आहे. औरंगाबादसाठी मुंबई विमानतळावर पोहोचले होते. पण, पुन्हा मातोश्रीवर परतले आहेत. अचानक दौरा का रद्द झाला, याचे कारण समजू शकले नाही. आज दिवसभरासाठी त्यांचा औरंगाबादच्या दौरा होता. त्यात वेगवेगळ्या विकासकामांना ते भेटी देणार होते. आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा रद्द झाल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज झाल्याची माहिती आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. अधिवेशन संपताच आदित्य ठाकरेंचा हा पहिला दौरा होता. या दौऱ्यांमध्ये आदित्य ऑरिक सिटी येथील आयुर्वेद उत्पादन निर्मिती प्रकल्पास भेट देणार होते. औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेची आणि वेरूळ लेणी परिसरात पर्यटकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचीदेखील आदित्य ठाकरे पाहणी करणार होते.
याशिवाय, विदेशी गुंतवणूक आणण्यासाठी 'ऑरा ऑफ ऑरिक' परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला आदित्य उपस्थित राहणार होते. विशेष म्हणजे या परिषदेत मंत्री, अधिकारी तसेच १० देशांचे राजदूतांचा सहभाग आहे. हे राजदूत शुक्रवारीच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. यात सिंगापूरचे राजदूत चिआँग मिंग फूंग, उपराजदूत झाक्यअस लिम, स्वीडनचे राजदूत ऐना लेकवाल, जर्मनीचे राजदूत मरजा सिरक्का, कोरियाचे राजदूत योंग ओग किम, इस्त्राईलचे राजदूत कोबी शोशानी, नेदरलँडचे राजदूत अल्बट्स विल्हेल्मस डी जोंग, रशियाचे राजदूत अलेक्सी सुरोवत्सेव, उपराजदूत गोओर्गी देअर हे आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.