आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साध्या बसनेच जावे लागते अजिंठा-वेरूळ लेणीला:पर्यटन बससेवा बंद पडली; 2 व्होल्व्हो धावतात पुण्याला

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा-वेरूळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी २०१५ साली दोन व्होल्व्हो बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पर्यटकांच्या संख्येनुसार या बसेस धावत होत्या. मात्र, कोरोनाकाळात पर्यटन बससेवा बंद पडली. ती अद्याप सुरूच झाली नाही. दोन्ही बस पुण्याला जिल्हा नियोजन व विकास महामंडळाच्या निधीतून तत्कालीन विभागीय आयुक्त उमाकांत दांगट व जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्या पुढाकारातून पर्यटकांसाठी परिवहन महामंडळाने स्वतंत्र दोन व्होल्व्हो बसेस खरेदी केलेल्या आहेत. दररोज मध्यवर्ती बसस्थानकावरून वेळेनुसार बस सुटत असे. ऑनलाइन आगाऊ सीट बुकिंगची व्यवस्था हाेती. मात्र, कोरोनात बस बंद राहिली. त्यानंतर पुरेसे प्रवासी मिळाले नाहीत. तसेच दररोज धावणाऱ्या साध्या बसमधून दोन्ही लेण्यांना जाण्याची सोय आहे. त्यामुळे व्होल्व्हो बस पुण्यासाठी सोडण्यात येत असल्याचे आगार व्यवस्थापक संतोष घाणे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...