आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:अजिंठ्याचे पर्यटक केंद्र चार वर्षांपासून बंदच ; पर्यटनमंत्री लोढा यांनी लक्ष घालण्याची मागणी

फर्दापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यटकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले अजिंठा पर्यटक केंद्र शासनाचा निधी न मिळाल्याने तसेच पाणी व वीज बिल थकल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. यामुळे त्या केंद्राची अत्यंत दुरवस्था झाली आहे. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हे पर्यटन केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

अजिंठा लेणीपासून चार किलोमीटर अंतरावर टी पॉइंट येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ६५ कोटी रुपये खर्च करून अजिंठा पर्यटन केंद्र उभे केले. १६ सप्टेंबर २०१३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद‌्घाटन झाले. सुरुवातीला येथे मोफत प्रवेश होता. या केंद्राच्या देखभाल व सुरक्षेसाठी ज्यांच्या जमिनी येथे संपादित केल्या गेल्या. अशा प्रकल्पग्रस्त व स्थानिक ७० जणांना रोजगार देण्यात आला. पाच वर्षानंतर शासनाचा निधी येण्यास बंद झाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे पाण्याचे ३ कोटी ९१ लाख रुपये बिल थकले. तसेच महावितरण कंपनीचे वीज बिल ४० लाख ८४ हजार रुपये थकल्याने वीजपुरवठा व पाणी कनेक्शन बंद करण्यात आले. यामुळे २०१८ मध्ये अजिंठा पर्यटक केंद्र बंद करण्यात आल्याने ७० लोकांचा रोजगार बुडाला आहे. केंद्राची दुरवस्था झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...