आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटकांचा जायकवाडीवर ‘सुपर संडे’:रस्त्याची दुरवस्था, उद्यान बंद असल्याने नाराजी

पैठणएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरण यंदा तुडुंब भरले आहे. नववर्षाच्या पहिला दिवस आणि रविवार असा सुवर्ण योग जुळून आल्याने पर्यटक मोठ्या संख्येने पैठणला दाखल झाले होते. एकाच दिवसात औरंगाबादसह आजूबाजूच्या जिल्ह्यांतून एक हजारांपेक्षा अधिक लोक येथे आले.

इतर पर्यटन क्षेत्राच्या तुलनेत जायकवाडीजवळ असल्याने धरण पाहण्यासाठी औरंगाबाद, जालनासह मराठवाड्यातील पर्यटकांची पावले पैठणकडे वळली आहेत. रविवारी आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्याने धरणावर मोठ्या प्रमाणात सहलीदेखील आल्या होत्या. यावेळी जायकवाडी धरणासह येथील तिर्थस्तंभ, पालथी नगरी, नागघाट आदी ठिकाणीदेखील सहली आल्या होत्या. परंतु पैठणचे मुख्य आकर्षण असलेले संत ज्ञानेश्वर उद्यान बंद असल्याने अनेक पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.

उद्यान सुरू व्हावे ^पर्यटन वाढले पाहिजे. यासाठी येथील संत ज्ञानेश्वर उद्यान सुरू व्हायला हवे. धरणालगतचे रस्ते व गोदावरी बोट विहार सुरू करणे आवश्यक आहे. या संदर्भात पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे व्यापारी वर्ग मागणी करणार आहे. पवन लोहिया, अध्यक्ष, व्यापारी महासंघ.

बातम्या आणखी आहेत...