आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:लिजेंड क्रिकेट स्पर्धेत रावडी सुपर किंग्जची एक्का लॉयन्सवर मात; संदीप नागरे ठरला सामनावीर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयटी मैदानावर सुरू असलेल्या लिजेंड क्रिकेट लीगमध्ये रावडी सुपर किंग्ज संघाने विजय मिळवला. शनिवारी झालेल्या लढतीत रावडीने एक्का लॉयन्सवर 9 धावांनी मात केली. या सामन्यात अनुभवी अष्टपैलू खेळाडू संदीप नागरे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना रावडीने 20 षटकांत 7 बाद 124 धावा उभारल्या. यात सलामीवीर संदीप सानपने 20 आणि कर्णधार अमित पाठकने 19 धावा केल्या. या जोडीने 40 धावांची सलामी दिली. सुदर्शन एखंडेने 13 धावा केल्या. संदीप नागरेने 19 चेंडूंत 1 चौकार व 1 षटकार लगावत 19 धावा केल्या. तळातील फलंदाज युवराज पवारने 20 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार खेचत सर्वाधिक 26 धावांची खेळी केली. रोहन राठोड 5 धावांवर नाबाद राहिला. संघाला 13 धावा अतिरिक्त मिळाल्या. एक्काकडून संदीप लहाने व विजय शेट्टीने प्रत्येकी दोन दोन गडी बाद केले. सय्यद जावेद, सागर जावळे यांनी प्रत्येकी एकाला टिपले.

नागरेची भेदक गोलंदाजी, 5 बळी घेतले

प्रत्युत्तरात रावडीने दिलेले माफक आव्हानही एक्का संघ पूर्ण करु शकला नाही. एक्का निर्धारित षटकांत सर्वबाद 115 धावा करु शकला. यात संघाची सुरूवात खराब झाली. यात रोहन शाह (1), रवींद्र बोडखे (6), कर्णधार अतुल वालेकर (5) हे आल्यापावली परतले. साई दहाळेने 45 चेंडूंत 5 चौकारांसह 32 धावा केल्या. संदीप लहानेने 17 चेंडूंत फटकेबाजी करत 1 चौकार व 4 उत्तुंग षटकार खेचत सर्वाधिक 34 धावा काढल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. अष्टपैलू संदीप नागरेने 11 धावा देत 5 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. निलेश सेवेकर व अमित पाठकने प्रत्येकी 2 बळी घेतले.