आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:जाफर गेट ते राजाबाजार रस्त्याची चाळणी, खड्डामुक्तीसाठी व्यापाऱ्यांचे पुष्पश्रद्धांजली आंदोलन

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक

शहरातील सर्वात जूनी व प्राख्यात बाजारपेठेतील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. यामुळे नागरिक, व्यापारी, ग्राहक, वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत. याकडे लक्ष वेधून किमान जाफर गेट ते राजाबाजा दरम्यान व इतवार बाजार येथे पक्का सिमेंटचा रस्ता व्हावा, यासाठी व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन शनिवारी लक्षवेधी पुष्पश्रद्धांजली आंदोलन केले. म्हणजे खड्याला फुले वाहून निषेध व्यक्त करण्यात आला.

जाफर गेट येथूनच जून्या बाजारात ये जा करता येते. १०० वर्षांपूर्वीपासून येथे बाजारपेठ बसलेली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील नागरिकांचा ओढ येथे असतो. हजारो नागरिक दररोज येथे अन्नधान्यासह जिवनावश्यक वस्तू आदी खरेदीसाठी येतात. परराज्यातून मालाचा पुरवठा केला जातो. येथील व्यापारी, व्यावसायिक प्रमाणिकपणे जीएसटी, इनकम टॅक्स, मनपाचा कर भरतात. मात्र, त्यांना मुलभूत सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही. विशेषत म्हणजे व्यापाऱ्यांच्या वतीने मनपा आयुक्तांना अनेकदा निवेदन देऊन रस्ता पक्का करण्याची मागणी केले गेली आहे. तरी देखील मनपा प्रशासनाने याकडे अजिबत लक्ष दिलेले नाही. उदासीन धोरणामुळे हजारो नागिरकांना कसाबसा मार्ग काढावा लागतो. वाहन चालक, ये जा करणाऱ्या नागरिक आणि वाहनाचे खड्ड्यात जावून पार्ट अन पार्ट ढिला होत आहे. खड्डा चुकवण्याच्या नांदात अपघात होऊन लोक जखमी होत आहेत. खड्यामुळे रस्ता आणखी खराब होत आहे. याकडे मनपा प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ, गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशन, मराठवाडा चेंबरर्स कॉमर्स असोसिएशन, हास्कन मुक्ती चॅर्टिबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जाफर गेट येथे शनिवारी सकाळी ११.३० वाजता खड्ड्यांना पुष्प श्रद्धांजली वाहून व पक्का रस्ता करा या घोषणा देऊन मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी व्यापारी असोसिएशचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, गुडस ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष फय्याज खान, जयकुमार ठाणवी, हरून मुक्ती चॅरिटेबल ट्रास्टचे अध्यक्ष इसुब मुकाती, किराणा असोसिएशनचे अध्यक्ष निलेश सेठी, हरवेंद्रसिंग सलोजा, मराठवाडा चेंबर्स कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालणी यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. विजय दशमीपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र निषेध आंदोलन छडले जाईल, असा इशारा काळे, खान यांनी दिला आहे.

व्यापाऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका

आमचे सर्व व्यापारी नियमित कराचा, इन्कम टॅक्स आदी कराचा भरणा करतात. मग आम्हाला रस्ते, पाणी, स्वच्छता, वीज अशा पायाभूत सुविधा का देत नाही? गत २० वर्षांपासून आम्ही मनपा प्रशासनाकडे सातत्याने मागणी करतो आहोत, अंमलबजावणी कधी करणार आहात? व्यापाऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. -जगन्नाथ काळे, अध्यक्ष, व्यापारी महासंघ.

दररोज अपघात होतात

सर्वात जूनी व प्रतिष्ठीत बाजारपेठ आहे. विविध जिल्ह्यातून व शहराच्या कानाकोपऱ्यातून येथे नागरिक अन्नधान्य, किराणा, तेल, आदी वस्तू खरेदीसाठी येतात. रस्त्याची चाळणी झालेली आहे. यामुळे दररोज खड्यात वाहन जावून अपघात होत आहेत. एतिहासिक शहरातील खड्डेमय रस्ते पाहून शर्मेन मान खाली जाते. आम्ही याबाबत आवाज उठवला व आंदोलन केले केली मरुम आणून टाकतात तो पावसाने वाहून जातो. त्या पेक्षा कायमस्वरूपी शाश्वत सिमेंटचा रोड करावा. -फय्याज खान, अध्यक्ष, गुड ट्रान्सपोर्ट असोसिएशन.