आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय चुकीचा असून या निर्णयाच्या विरोधात बुधवारी ता. ७ सकाळी आकरा वाजता व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन मुख्य बाजारपेठेत निषेधाचे फलक फडकवले. दोन दिवसांत याबाबत निर्णय न घेतल्यास दुकाने सुरु करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
येथील जवाहर रोड भागातील बाजारपेठेत आमदार तान्हाजी मुटकुळे, नगरअध्यक्ष बाबाराव बांगर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, व्यापारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नरसेवक अनिल नेनवाणी, जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, शहरअध्यक्ष सुमीत चौधरी, हमीद प्यारेवाले, शाम खंडेलवाल, ओम नेनवाणी, यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. यावेळी लॉकडाऊचा निर्णय मागे घेण्याचे फलक झळकविण्यात आले.
त्यानंतर व्यापारी संघटनेच्या मागण्या संदर्भात व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. मागील वर्षभरा पासून कोरोनाच्या संकटा मुळे व्यापारी, कारखानदार, मजूरदार अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जिवन जगत आहेत. कोरोनाच्या काळात दुकान बंद असतांनाही कराचा भरणा करावा लागला. तसेच विज देयकाचाही भरणा करावा लागला. या शिवाय सर्व समान्य मजुरदारांचीही उपासमार होऊ लागली आहे.
जिल्हयात मागील काळात व्यापाऱ्यांनी हजारो प्रवाशी, गरजूंना जिवनावश्यक वस्तुंची मदत केली. मात्र व्यापाऱ्यांना शासकिय यंत्रणेकडून मोठ्या त्रासाला समाेरे जावे लागले आहे. आता व्यापाऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी. पुढील दोन दिवसांत याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा व्यपारी स्वतःहून दुकाने सुरु करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड चाचणी करा
हिंगोली शहरासह जिल्हाभरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यांना आवर घालण्यासाठी त्यांची सक्तीने कोविड चाचणी करावी. तसेच त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करावे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.