आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक बदल:मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी वाहतूक बदल, कर्णपुरा मैदानावर स्क्रीन लावणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘स्वाभिमान सभा’ ८ जून रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोमवारी सकाळी सभेच्या स्थळाची पाहणी करत आसनव्यवस्था, पार्किंग, स्टेज आणि मंडपाची माहिती घेतली. सभेत जास्त गर्दी झाली तर कर्णपुरा येथील मैदानावर स्क्रीन लावून शिवसैनिकांना सभा ऐकण्यासाठी बसता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. यासह पार्किंग कुठे-कुठे असेल, कोणते रस्ते बंद करावे लागतील, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कुणीही शिरू नये यासाठी पोलिस प्रशासन आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. सभेच्या तयारीचे ६० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या वेळी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त उज्ज्वला वनकर, दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त अशोक थोरात, पोलिस निरीक्षक अशोक गिरी, कैलाश देशमाने, मनोज बहुरे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदींची उपस्थिती होती.

बुधवारी सायंकाळी हे रस्ते बंद ८ जून रोजी संध्याकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत जुनी मल्टिपर्पज शाळा ते नारळीबाग कमान, भडकल गेटशेजारील आयटीआय मुलींचे हायस्कूल ते खडकेश्वर टी पॉइंट, मिल कॉर्नर ते महात्मा फुले चौक - औरंगपुरा, ज्युबिली पार्क ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानाकडे जाणारा रस्ता आणि आशा ऑप्टिकल्स ते सभा मैदानाकडे जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. पर्यायी मार्ग म्हणून नागरिकांनी मिल कॉर्नर ते भडकल गेट असा रस्ता वापरावा.

बातम्या आणखी आहेत...